

अमरावती -अमरावती जिल्ह्यामध्ये काल अचानक मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने संपूर्ण जिल्ह्यातील नदी नाले तुडुंब वाहत आहे. दरम्यान जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील थीलोरी येथे झालेल्या मुसळधार पावसाने शेताच्या रस्त्यांना नदीचे स्वरूप आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. शेतकरी आपला जीव मुठीत घेऊन घरी परतत असल्याचे पाहायला मिळत आहे. काल अचानक आलेल्या पावसाने शेती रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आल्याने दोन बैलगाड्या नदी सदृश पाण्यातून आपली वाट काढत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान शेतकरी घरी परतण्यासाठी आपला जीव मुठीत घेऊन बैल गाडीतून घरी परतत असल्याचे दिसून येत आहे