
अकोलाः (AKOLA)चौथ्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या चार विद्यार्थिनींवर दोन शिक्षकांनी (sexual abuse)लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्यात उघडकीस (Sexually abused by two teachers) आलाय. गुरू शिष्याच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या शिक्षकांविरुद्ध (POLICE)पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुमारे दोन महिने हा प्रकार सुरू होता. पालकांना तो समजल्यानंतर त्यांनी बुधवारी बार्शीटाकळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी सहायक शिक्षक सुधाकर( Ramdas clouds)रामदास ढगे ( वय ५३ रा. अकोला) व राजेश रामभाऊ तायडे (वय ४५, रा. अकोला) या नराधमांना तातडीने अटक केली. गुरुवारी न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार(Barshitakali taluk) बार्शीटाकळी तालुक्यात (Dhamandari)धामणदरी या गावात ही घटना घडली. धामणदरी हे छोटेसे गाव अकोल्यापासून ३० ते ४० किमी अंतरावर आहे. या गावात(Zilla Parishad School) जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग. तिथे फक्त चार मुली व पाच मुले शिक्षण घेतात. या शाळेवर या दोन शिक्षकांची नियुक्ती होती. या दोन नराधमांनी चारही मुलींवर दोन महिन्यांपासून लैंगिक अत्याचार केले. घाबरलेल्या मुली काहीच बोलत नसत. एका मुलीने अखेर पालकांना खरे कारण सांगितले. या पालकांनी इतर तीन कुटुंबांशी संपर्क साधला. अखेर चारही पालकांना अत्याचाराबाबत माहिती मिळाली. त्यांनी बुधवारी बार्शीटाकळी पोलिस ठाण्यात धाव घेत शिक्षकांविरोधात तक्रार दिली. त्यांच्याविरोधात (Prevention of Child Sexual Abuse Act)बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेनेही या शिक्षकांना तडकाफडकी बडतर्फ केले.