

12th result :राज्यातील बारावीचा निकाल आज 5 मे रोजी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल 5 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे.
याबाबत राज्य शिक्षण मंडळाने माहिती दिली आहे. तर मंगळवारपासून (6 मे) महाविद्यालयमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिका दिली जाणार आहे.
📖 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं उच्च माध्यमिक प्रमाणपत्र निकालासाठी अधिसूचना जारी केली आहे.
2025 च्या बारावी परीक्षेसाठी एकूण 15,13,909 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ही परीक्षा 11 फेब्रुवारी ते 11 मार्च 2025 दरम्यान राज्यभरातील 3,373 परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती.
दरम्यान, दहावीचा निकाल देखील लवकरच जाहीर होणार असल्याचे बोलले जात आहे. दहावीच्या परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच 15 मे पूर्वी घोषित केला जाऊ शकतो.