‘या’ ठिकाणी झालेल्या गोळीबारात चौघे जण जखमी

0

हिंगोली (Hingoli), २३ नोव्हेंबर

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हिंगोलीत शिंदे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हिंसक वाद झाल्याचे वृत्त आहे. २३ नोव्हेंबरला दुपारी दोनच्या सुमारास या घटनेत गोळीबार झाला, त्यामुळे एका तरुणासह चारजण जखमी झाले.

हाणामारीत भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्या घरावर हल्ला केला गेला. त्यावेळी घरासमोरील दोन गाड्या फोडण्यात आल्या. गोळीबारात कळमनुरीतील नवनिर्वाचित आमदार संतोष बांगर यांच्या पुतण्याला गोळी लागल्याची माहिती आहे. त्यांना पुढील उपचारांसाठी हैदराबादला हलवण्यात आले आहे, तर इतर जखमींवर नांदेडमध्ये उपचार सुरू आहेत.

तलवारीच्या वाराने पप्पू चव्हाण यांचे बंधू गंभीर जखमी झाले. याप्रकरणी हिंगोली पोलीस ठाण्यात ६०-७० लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजकीय वातावरण तापलेल्या या घटनेनंतर शहरात तणाव निर्माण झाला आहे. मराठवाड्यातील विधानसभेच्या चुरशीच्या निकालांदरम्यान अशा घटनांमुळे राज्यात अस्थिरता वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.