पीक पाहणी दरम्यान दोन गटात हाणामारी ; सात जणांविरुद्ध गुन्हा

0

 

बुलढाणा – खामगाव तालुक्यातील राहुड येथे शेत शिवारात कृषी अधिकारी यांच्या पथकामार्फत कपाशी मार्गदर्शन कार्यक्रम सुरू असताना, दरम्यान दोन कुटुंबात शाब्दिक वाद होऊन वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या प्रकरणी गावचे पोलीस पाटील विलास बनसोडे यांनी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून चार जणांविरुद्ध आणि रामेश्वर डाबेराव यांनी दिलेल्या तक्रारीवरून तीन जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आलीआहे. पुढील तपास ठाणेदार आडे यांचे सह उपविभागीय पोलीस अधिकारी करत आहेत.