नागरिकांचे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण

0

 

अमरावती – अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सातेगाव येथे घरकुल वाटपात मोठा घोळ झाल्याचा आरोप करीत काही लाभार्थ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण गेल्या 14 ऑगस्टपासून सुरू केले आहे. जोपर्यंत संबधितांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. प्रधानमंत्री आवास योजना ही गोर गरिबांसाठी आहे की, श्रीमंत लोकांसाठी आहे? असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.