

नागपूर (Nagpur)दत्तवाडी सुरक्षा नगर परिसरातील नागरिक लावारिस कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाने त्रस्त झाले आहेत. अलीकडेच, या कुत्र्यांनी दीड वर्षांच्या चिमुरडीला चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चार दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेत, कुत्र्याने मुलीला घरातून फरफटत नेले, ज्यामुळे तिच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या.
वाडी नगर परिषद कुंभकर्णाच्या झोपेत
कुत्र्यांचा धुमाकूळ
स्थानिक नागरिकांनी नगर परिषदेला या प्रकरणाची तक्रार केली आहे, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. यापूर्वीही, परिसरातील चार नागरिकांना लावारिस कुत्र्यांनी चावा घेतला होता. या बाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे चार वेळा तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. तरीही, प्रशासनाची निष्क्रियता नागरिकांमध्ये संताप निर्माण करत आहे.
दत्तवाडी सुरक्षा नगर परिसरात लावारिस कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिक हैराण
दत्तवाडी परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन नगर परिषदेकडे धाव घेतली असून, त्यांनी प्रशासनाकडून तातडीने योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या नागरिकांमध्ये बेबीताई ढबाले (माजी सरपंच), राजेश बोरकर, नवीन श्यामकुवर, हर्षल देविदास बांद्रे, सुकेशिनी चोखंदरे, प्रमोद धांडे, सुनंदा प्रकाश निंबाळकर, कविता जनबंधू, किरण ठोमरे, उज्ज्वला सुपटकर, मीना अंभोरे, विजय काळे, रुखमा घरमाळे, अभय कालमेघ, पुष्पा नारेकर, रिता भुजाडे, जया टिचकुले, संगीत टिचकुले, मीनाक्षी ठवकर, नरेंद्र ढबाले, पंकज ढोमणे, दीपाली माहुलकर, राजश्री म्हरसकोल्हे, आणि ज्ञानेश्वर कोसरे यांचा समावेश आहे.