
CHNDRAPUR चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुका क्रीडा संकुलात रंगतेय 67 वी राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा, 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत 11.3 सेकंदाची वेळ नोंदवत महाराष्ट्राचा कॅस्टलिओ ठरला अव्वल तर मुलींमध्ये समिता सावंत हिने मारली बाजी, सर्वच खेळाडूंनी बल्लारपूर येथील क्रीडा स्पर्धेत चोख सुविधा उभारणाऱ्या पालकमंत्री सुधीर मनगंटीवार यांच्या प्रयत्नांची केली प्रशंसा..
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुका क्रीडा संकुलात 67 वी राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा रंगतदार वळणावर आली आहे. 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत 11.3 सेकंदाची वेळ नोंदवत महाराष्ट्राचा कॅस्टलिनो अव्वल ठरला तर मुलींमध्ये समिता सावंत हिने बाजी मारली. सर्वच खेळाडूंनी बल्लारपूर येथील क्रीडा स्पर्धेत चोख सुविधा उभारणाऱ्या पालकमंत्री सुधीर मनगंटीवार यांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. या चार दिवसांच्या राष्ट्रीय स्पर्धेत एकूण 60 प्रकारचे खेळ होत असून 180 पदकांचे वितरण होणार आहे. स्पर्धा आता अंतिम टप्प्याकडे वळत असताना विविध पात्रता फे-यानंतर आता अंतिम महा मुकाबले रंगत असून त्यात सर्वच खेळाडूंचे कौशल्य पणाला लागत आहे. दुसरीकडे स्पर्धा आयोजकांसाठी देखील हा अत्यंत निर्णायक क्षण असून निवास- भोजन- वाहतूक यासह सर्वच सुविधा चोख राहतील याकडे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात आयोजन समिती सदस्य लक्ष देत आहेत. तालुका क्रीडा संकुल असूनही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एखाद्या राजधानीच्या शहराला लाजवेल अशा सुविधा बल्लारपूर तालुका क्रीडा संकुलात उभारली असून त्याचे देशाच्या विविध भागातून आलेल्या खेळाडूंनी भरभरून कौतुक केले आहे.