
पूर्वी क्रिकेटमध्ये केवळ कसोटी क्रिकेट होते. आणि विविध देशांमध्ये मॅचेस होत होत्या. त्यावेळी आपण भारताच्या बाजूने टाळ्या वाजवत असू किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आपण बऱ्याचवेळा वेस्ट इंडिजच्या बाजूने आनंद व्यक्त करीत असू तर इंग्लंड च्या विरुध्द जिंकणार्या संघाच्या बाजूने असू. मुंबई विरुद्ध दिल्ली असेल तर आपण मुंबईच्या बाजूने असू !
तसेच राजकारणात काहीजण कोंग्रेसच्या बाजूने, काही भाजपच्या बाजूने, काही शिवसेनेच्या बाजूने तर काहीजण राष्ट्रवादीच्या बाजूने होतो. तसेच जसे आपले आपले म्हणून काही आवडीचे खेळाडू असत त्यांचे आपण समर्थक होतो. परंतु पुढे IPL च्या मॅचेस सुरु झाल्या आणि माझ्या सारख्यांची अडचण झाली. कारण आपले आवडते खेळाडू वेगवेगळ्या संघात खेळत असल्याने कोणत्या संघाच्या विजयाबद्दल टाळ्या वाजवाव्यात हे समजेनासे झाले. तसेच राजकारणी व्यक्तीबद्दल हीच समस्या निर्माण झाली आहे. आपले आवडते नेते विविध पक्षात असल्यामुळे कोणत्या पक्षाच्या विजया बद्दल आनंद व्यक्त करावा हे समजत नाही.
जसे एखादा खेळाडू पुढच्यावेळी कोणत्या संघात असेल असे सांगता येत नाही. त्यामुळे आपण आता केवळ खेळ पहायचा व आनंद घ्यायचा असे माझा मित्र म्हणतो पचवायला जरा जड जाते परंतु त्याशिवाय पर्यायही नाही. नेमके तसेच आपला आवडता नेता पुढच्यावेळी कोणत्या पक्षात असेल हे सांगता येत नाही. त्यामुळे आता केवळ खेळाडूचा खेळ पाहून आनंद घ्यायचा त्याचा संघ कोणता हे पहायचे नाही. हेच तत्त्व राजकारणातही लागू होते की काय?
आणि यातील सर्वात वेदनदाई गोष्ट म्हणजे आपले पंतप्रधान. ते प्रामाणिकपणे भ्रष्टाचार विरोधी आहेत असे समजून मी त्यांना मोठ्या उत्साहाने मत दिले. पण त्यांनी तर कमालच केली. आसाम मध्ये काँग्रेसच्या मुकग्यमंत्र्या विरुद्ध भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. मोठे आरोपपत्र तयार केले.आणि मग त्याला आपल्या पक्षात घेऊन तेथील सरकार पाडले. आणि पुन्हा त्याच माणसाला मुख्यमंत्री केले. असे अनेक ठिकाणी केले.आता महाराष्ट्रात मोदींनी हेच केले.त्यांच्याकडे अदानी ची पैशाची थैली आहे.
तेंव्हा आज देशातील सर्वात भ्रष्ट नेता कोण हे स्पष्ट आहे.
माझ्यासारख्या उतार वयातील माणसाचे मन आज उदास आहे.
डॉ. ह.ना. जगताप