

चिमूर (Chimur) :- महाराष्ट्र राज्य शासनाचे परिपत्रक नुसार दि. 5 सप्टेंबर ला श्री सर्वज्ञ् चक्रधर स्वामी अवतार दिन प्रत्येक शासकीय कार्यालयात साजरा करण्यात यावा असा निर्णय घेण्यात आला त्यानुसार अनेक कार्यालयात शासन मान्य फोटो ठेऊन माला अर्पण करावी असे निर्देश दिले मात्र अनेक शासकीय कार्यालयात फोटो उपलब्ध नसल्याची माहिती विलास डांगे माजी जिल्हा परिषद सदस्य यांना समजली लागलीच भद्रावती येथून पाच फोटो मागवून शासकीय अधिकारी यांचेशी सपंर्क करत फोटो भेट देऊन चिमूर पंचायत समितिचे गटविकास अधिकारी श्री नितीन फुलझले यांचे अध्यक्षतेखाली व विलास डांगे यांचे प्रमुख उपस्थितीत पंचायत समिती सभा हालमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली त्यावेळी व्यापारी संघटनेचे सचिव श्री बबन बन्सोड, संजय गेडाम सरपंच येरखडा, डॉ. अलोणे सरपंच कोलारी,सहायक गट विकास अधिकारी सहारे मॅडम, विस्तारधिकारी शामकुळे, विस्तारधिकारी उघडे, इतर विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांचे उपस्थितीत उत्साहात पार पडले श्री विलास डांगे यांनी स्वामीचे कार्य व विचार व्यक्त केले संचालन बबन बन्सोड यांनी केले