चिमुकल्यांचा दिंडी सोहळा,विद्यार्थ्यांनी घेतला फुगडीचा आनंद

0

 

बीड- बीडच्या आष्टी येथे शालेय विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा पार पडला. या दिंडीमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आष्टीतील विविध शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांनी दिंडीत सहभागी होत भगवा पताका फडकविला आहे. आष्टीतील कै. गंगुबाई आनंदराव धोंडे प्राथमिक शाळा आणि पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी या दिंडीमध्ये सहभागी झाले होते. या दिंडी सोहळ्यामुळे आष्टी गावात विठू नामाचा गजर ऐकायला मिळाला तर शालेय विद्यार्थ्यांनी दिंडीचा अनुभव घेतला. तर महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी रिंगण करत फुगडीचा आनंद लुटला आहे. चिमुकल्यांचा हा दिंडी सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी देखील गर्दी केली.