Children’s dance competition : मधुरा व सुर्वी बालनृत्‍य स्‍पर्धेचे विजेते

0

स्‍पर्धेला बालकांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद

नागपूर(Nagpur), 17 जुन :- नीलशोभा बहुउद्देशीय संस्था नागपूर बाल नृत्य स्पर्धेत 60 बालकांनी सहभाग घेत नृत्‍य स्‍पर्धेला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद दिला. अ गआतील मधुरा मेहेर हिने प्रथम तर ब गटातून सुर्वी क्षीरसागर हिने प्रथम क्रमांक पटकावला.

रविवारी लोकमान्य टिळक सभागृह, कस्तुरबा भवन येथे झालेल्‍या या स्‍पर्धेत वय 5 ते 10 वर्ष या अ गटातील 35 बाल कलावंत तर 11 ते 18 वर्षे या ब गटातील 25 बालकलावंत सहभागी झाले होते. अ गटात द्वितीय क्रमांक इशिता वाटकर, तृतीय क्रमांक गुल्हाने आणि उत्तेजनार्थ पारितोषिक त्रिशा मेंढेकर, जीविका येंडे, पूर्वी वाकडे यांनी पटकावला. ब गट द्वितीय क्रमांक विदिशा कोयंदे, तृतीय सुशांत जयस्वाल तर उत्तेजनार्थ रश्मी पारधी, आलिशा हेडाऊ यांना बक्षिस म‍िळाले.
यावेळी झालेल्‍या पारितोषिक वितरण कार्यक्रमात विजेत्‍यांना स्‍मृतीचिन्‍ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देवून सन्मानित करण्‍यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईचे कार्यकारी सदस्‍य संजय रहाटे, जेष्ठ नाट्यकर्मी महेश रायपूरकर, प्रयास बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्‍या प्रियंका ठाकूर, साई श्रवण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्‍या रूपाली मोरे, शील कलासागरचे योगेश राऊत, रशुद्दी बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण संस्थेच्‍या सुनीता गजभिये, रंगभूमी नागपूरचे अमित कुबडे, श्री सद्गुरू कृपा बहुउद्देशीय संस्थेच्‍या दीप्ती भाके, शाहिर टेंभुर्णी गुरुजी सार्वजनिक वाचनालय संस्थेचे अलंकार टेंभुर्णे, रुखमाई सेवा मंडळ नागपूरचे विलास कुबडे यांची विशेष उपस्‍थ‍िती होती. स्‍पर्धेचे परीक्षक म्हणून श्रद्धा रायकर, अमन शेख, सतीश बगडे यांनी कामगिरी पार पाडली. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता निलशोभा बहुउद्देशीय संस्थेचे अध्‍यक्ष नितीन पात्रीकर, किशोर डाऊ, प्रशांत मंगदे यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन समृद्धी काळाशीकर यांनी केले. सर्व सहभागी कलावंताला प्रमाणपत्र देण्यात आले.