मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक रेव्ह पार्टी होत आहेत – विजय वडेट्टीवार

0

 

नागपूर – अंमली पदार्थ, ड्रग्जमुळे प्रगतिशील, पुरोगामी राज्य बुडत चाललं आहे. महाराष्ट्रात कायदा सुवस्था बिघडली आहे. गुटखा तंबाखू उघडपणे विकला जात आहे. रेव्ह पार्टी खुलेआम सुरू आहे. त्याकडे लक्ष नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पकड मुख्यमंत्री असताना जी होती, ती पकड उपमुख्यमंत्री झाल्यापासून सुटत चालली आहे. सर्रास रेव्ह पार्टी सुरू आहे. मुख्यमंत्री यांच्या जिल्ह्यात ठाण्यात सर्वाधिक रेव्ह पार्टी होत आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात चुल्लुभर पाण्यात डूब मरण्याची वेळ आहे. ती आता खरी होंताना दिसून येत आहे. भारत देश म्हणजे फक्त गुजरात नाही. एकेकाळी उद्योग क्षेत्रात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राला गुंतवणूकदारांनी पसंती दिली होती. आता आपला प्राधान्यक्रम हा महाराष्ट्राचा आठव्या व नवव्या स्थानावर जाऊन पोहोचला आहे. उद्योग झपाट्याने पळवले जात आहेत असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केले.