मुख्यमंत्र्यांनी २ दिवसांत उमेदवारीचे आश्वासन दिले

0

नाशिक(Nashik): खासदार हेमंत गोडसे यांनी हनुमानाचे दर्शन घेतले आरती केली. नाशिकच्या जागेबाबत हेमंत गोडसे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळणार,मुख्यमंत्र्यांनी २ दिवसांत उमेदवारी जाहीर करण्याचे आश्वासन दिले.अजय बोरस्ते यांनी देखील माझ्या उमेदवारीला पाठिंबा दिला. पदाधिकाऱ्यांनी एकमताने मला उमेदवारी द्यावी, हे मुख्यमंत्र्यांना सांगितलंय,मित्र पक्षांचा दावा असला तरी ही जागा शिवसेनेलाच सुटेल असा दावा हेमंत गोडसे यांनी केला.