मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली वरळी येथील कोस्टल रोडची पाहणी

0

 

मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील वरळी येथील कोस्टल रोडजवळ जाऊन पाणी साचण्याची कारणे जाणून घेतली. येथील परिस्थितीची पाहणी केली. या भागात पाणी साचू नये याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. आज जरी याठिकाणी पाणी नसले तरी काल मुंबईत झालेल्या पहिल्याच पावसामुळे इथे पाणी साचून हा परिसर जलमय झाल्यामुळे येथे अनेक वाहने अडकून पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने भेट देत येथील परिस्थिती जाणून घेतली.