Chief minister Devendra fadnavis : मुख्‍यमंत्री शपथविधि सोहळ्याचे होणार थेट प्रक्षेपण

0

खासदार सास्‍कृतिक महोत्‍सव समितीद्वारे
मुख्‍यमंत्री शप‍थविधीचे 5 तारखेला थेट प्रक्षेपण

आपले लाडके नेते मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस उद्या, 5 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5.30 वाजता मुंबईतील आझाद मैदानावर मुख्‍यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. नागपूरकरांसाठी हा ऐतिहासिक सोहळा ठरणार असून त्‍याचे सर्वांना साक्षीदार होता यावे, या उद्देशाने खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव समिती, नागपूरच्‍यावतीने शपथविधी सोहळ्याच्‍या थेट प्रक्षेपणाची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे.

Chief minister Devendra fadnavis : मुख्‍यमंत्री शपथविधि सोहळ्याचे होणार थेट प्रक्षेपण

त्‍याकरिता ईश्‍वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे पटांगण, क्रीडा चौक, हनुमान नगर, नागपूर ‘खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव – 2024’ च्‍या कार्यालयासमोर मोठा स्‍क्रीन लावण्‍यात आला असून दुपारी 4.30 वाजतापासून शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. समस्‍त बांधवांनी या आनंदोत्‍सवात सहभागी व्‍हावे, असे आवाहन खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव समितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी व इतर कार्यकारिणी सदस्‍यांनी केले आहे.