मृत्यूचे तांडव; 18 जण दगावले

0

छत्तीसगडमधील कवार्धामध्ये मंगळवारी सकाळी एका भीषण अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला आहे तर २५ जण जखमी झाले आहेत. पिकअप वाहन एका खोल खड्ड्यात पडल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. (Chhattisgarh Accident)

अभिषेक पल्लव, कवार्धाचे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले की, अपघात सकाळी ८ वाजता कवार्धा-कटघोरा रस्त्यावर झाला. पिकअप वाहनात ३० ते ३५ मजूर प्रवास करत होते. वाहन खड्ड्यात पडून पलटून गेले, ज्यामुळे वाहनातील अनेक प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी मृत्यूचे दुःख व्यक्त केले आणि जखमींच्या लवकर बरे होण्याची कामना केली. स्थानिक प्रशासन पीडित कुटुंबांना मदत करत आहे. पोलिसांनी अपघाताची चौकशी सुरू केली आहे आणि वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

छत्तीसगढ़ के कवर्धा जिले में सोमवार को एक दर्दनाक हादसा हो गया। इस हादसे में 18 लोगों की मौत हो गई जबकि कई लोग गंभीर रूप से घायल हैं। घायलों को इलाज के लिए अस्पताल में भर्ती किया गया है। बताया जा रहा है कि हादसे में मरने वाले सभी मजदूर थे और तेंदूपत्ता तोड़कर लौटकर रहे थे तभी हादसा हुआ है। शुरुआती जानकारी के अनुसार, तेंदूपत्ता तोड़कर सभी मजदूर एक पिरअप से वापस लौट रहे थे लेकिन पिकअप नियंत्रित होकर पलट गया जिस कारण से यह हादसा हुआ।

 

१७ जणांचा मृत्यू; २५ जण जखमी
पिकअप वाहन खोल खड्ड्यात पडले

छत्तीसगडमधील कवार्धामध्ये मंगळवारी सकाळी एका भीषण अपघातात १७ जणांचा मृत्यू झाला आहे तर २५ जण जखमी झाले आहेत. पिकअप वाहन एका खोल खड्ड्यात पडल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अभिषेक पल्लव, कवार्धाचे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले की, अपघात सकाळी ८ वाजता कवार्धा-कटघोरा रस्त्यावर झाला. पिकअप वाहनात ३० ते ३५ मजूर प्रवास करत होते. वाहन खड्ड्यात पडून पलटून गेले, ज्यामुळे वाहनातील अनेक प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी मृत्यूचे दुःख व्यक्त केले आणि जखमींच्या लवकर बरे होण्याची कामना केली. स्थानिक प्रशासन पीडित कुटुंबांना मदत करत आहे. पोलिसांनी अपघाताची चौकशी सुरू केली आहे आणि वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी
मंगळवारी दुपारी 1 वा. जाहीर होणार ऑनलाइन निकाल

राज्यभरातील 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी – मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या मंगळवारी दुपारी 1 वा. ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे. अखेर आज राज्य मंडळाने पत्रकार परिषद घेऊन निकालाची तारीख जाहीर केली आहे. ऑनलाइन पद्धतीने हा निकाल जाहीर होणार असून निकाल जाहीर झाल्यानंतर ५ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करण्याची असल्यास अर्ज करता येणार आहे.

 

ISIS च्या 4 दहशतवाद्यांना अटक
अहमदाबाद विमानतळावर केली कारवाई
गुजरात एटीएसएने आज अहमदाबाद विमानतळावरून चार इसिस दहशतवाद्यांना अटक केली आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, श्रीलंकन वंशाचे ​​नागरिक अहमदाबाद विमानतळावर आल्याचे केंद्रीय एजन्सीच्या इनपुटनंतर या चौघांना अटक करण्यात आली आहे. गुजरात किंवा इतर राज्यांमध्ये याचे काही कनेक्शन आहे का याचा शोध एटीएसए करत आहे.
दुसरीकडे, आयपीएलचे तीन संघ आज अहमदाबादला पोहोचणार आहेत. मंगळवारी क्वालिफायर-1 आणि एलिमिनेटर सामना बुधवारी होणार असल्याने या संघांना आज अहमदाबादला पोहोचायचे आहे. या संघांपैकी आरसीबीची टीम दुपारी साडेबारा वाजता अहमदाबाद विमानतळावर पोहोचली, त्यामुळे विमानतळावर हाय अलर्टसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

ठाकरे-भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
आमदार देवयानी फरांदे-माजी आमदार वसंत गीतेंमध्ये जुंपली

नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये आज मतदानाप्रक्रिया पार पडत आहे. यादरम्यान जुन्या नाशिक परिसरामध्ये असलेल्या मतदान केंद्रांवर माजी आमदार वसंत गीते आणि भारतीय जनता पक्षाच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या चांगलीच बाजाबाची झाली आहे. या प्रकरणी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोरासमोर येऊन घोषणाबाजी केल्यामुळे काही काळ परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर शहरातील भद्रकाली पोलिस ठाण्यासमोर देखील भाजपच्या आमदार देवयानी फरांदे आणि माजी आमदार वसंत गीते यांचे समर्थक समोरासमोर आले होते.

बोगस कागदपत्रांसह आरटीई प्रवेश
17 पालकांविरोधात गुन्हा दाखल

नागपुरात, शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशासाठी बोगस कागदपत्रे दाखल करून प्रवेश मिळवणाऱ्या 17 पालकांविरोधात बर्डी पोलिस ठाण्यात 420 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पालकांनी आपल्या मुलांना जवळच्या अनुदानित किंवा सरकारी शाळांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी बनावट निवासस्थानाचे पुरावे आणि इतर कागदपत्रे सादर केली. हे मुलं त्यांच्या घरापासून 3 किलोमीटरच्या आत राहत नव्हते, ज्यामुळे आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी ते पात्र नव्हते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आणि भविष्यातील अशा घटना टाळण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने एक समिती स्थापन केली आहे. समिती या 17 प्रकरणांचा तपास करेल आणि आवश्यक तेथे पुढील कारवाई करेल. या घटनेमुळे शहरातील आरटीई प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणि जबाबदारी राखण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शिक्षण विभागाने या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

मुल्यमापन करून प्रकल्पग्रस्तांना मोबदला द्या
जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कुंदा राऊत यांची मागणी
राष्ट्रीय महार्गासाठी जागा अधिग्रहीत करण्यात आलेल्या नागपूर (ग्रामीण )मधील मौजा-येरला येथील वैयक्तिक व शासकीय मालमत्तेचे मुल्यमापन करून प्रकल्पग्रस्तांना मोबदला देण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कुंदा राऊत यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
महामार्गासाठी जागा अधिग्रहीत करण्यात आलेल्या मालमत्ताधारकांना मोबदला मिळण्यासंदर्भात १४ मे रोजी उपविभागीय अधिकारी यांच्याशी त्यांच्या कक्षात पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच व येथील नागरिकांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली होती. यावेळी प्रकरण तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु अद्याप मालमत्ताधारकांना कोणत्याही प्रकराचा मोबदला देण्यात आलेला नाही. यावर तातडीने कार्यवाही करावी. अशी मागणी त्यांनी केली आहे/