Chhattisgarh Naxal : ‘इथे’ सापडली हजारो नक्षली लपू शकतील अशी गुहा

0

Chhattisgarh Naxal : छत्तीसगडमध्ये नक्षल विरोधी मोहिमेला मोठं यश; कर्रेगट्टा जंगलात सापडली हजारो नक्षली लपू शकतील अशी गुहा

Chhattisgarh Naxal गेल्या पाच दिवसांपासून छत्तीसगडच्या कर्रेगट्टा जंगलात सुरू असलेल्या सर्वात मोठ्या नक्षलविरोधी ऑपरेशनला मोठे यश आले आहे. यात एक हजार नक्षलवादी लपून बसतील, अशी गुहा सापडली आहे.

गडचिरोली (GADCHIROLI) : गेल्या पाच दिवसांपासून छत्तीसगडच्या कर्रेगट्टा जंगलात सुरू असलेल्या सर्वात मोठ्या नक्षलविरोधी ऑपरेशनला मोठे यश आले आहे. कर्रेगट्टाच्या टेकड्यांवर एक हजार नक्षलवादी लपून बसतील, अशी गुहा सापडली आहे.

विजापूर आणि तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या करेगट्टाच्या टेकड्यांमध्ये नक्षलवाद्यांविरुद्ध गेल्या 5 दिवसांपासून ऑपरेशन सुरू आहे.सुरक्षा दलाच्या कठोर परिश्रमानंतर आणि 45 अंश तापमानात, सैनिक अखेर नक्षलवाद्यांच्या लपण्याच्या एका ठिकाणी पोहोचण्यात यशस्वी झाले आहेत. परंतु सैनिक तेथे पोहोचण्यापूर्वीच नक्षलवाद्यांनी त्यांचे लपण्याचे ठिकाण बदलले आहॆ.तेथे नक्षलवाद्यांच्या उपस्थितीचे खूणा सापडले आहेत.

या गुहेत एक हजाराहून अधिक नक्षलवादी अनेक दिवस आरामात आश्रय घेऊ शकतात. गुहेच्या आत पाण्यापासून ते विश्रांतीच्या सुविधांपर्यंतच्या सुविधा आहेत.गुहेच्या आत एक खूप मोठे मैदान देखील आहे.

दरम्यान या चकमकीत आतापर्यंत 7 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले असून शनिवारी अभियानादरम्यान तीव्र उन्हामुळे तब्बल 40 जवानांना डीहायड्रेशनचा त्रास जाणवू लागला. त्यांना वायुसेनेच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने तेलंगणातील भद्राचल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.या अभियानात जवळपास पाच ते सात हजार सुरक्षा दलाचे जवान सहभागी झाले असून सुमारे 500 ते 700 नक्षलवादी जंगलात लपून बसल्याची माहिती आहे.