छत्रपतींची खरी वाघनखं ही शिवसेना आहे – संजय राऊत

0

 

मुंबई- गेल्या वर्षभरात महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान हा सत्ताधाऱ्यांनी नष्ट केला आहे. वाघनखं म्हणजे काय असतं? महाराष्ट्राचा स्वाभिमान व महाराष्ट्राचा अभिमान हीच महाराष्ट्राची वाघनखं आहेत. भाजपने शिवसेना तोडून फोडून ही वाघनखं बोथड केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा काढला, म्हणजे दिल्लीचा कोथळा काढला. महाराष्ट्र त्यावेळी मजबुतीने उभा होता. पण छत्रपतींची खरी वाघनखं ही शिवसेना आहे, हे लक्षात ठेवा. गेले 50-55 वर्ष या महाराष्ट्रावर येणाऱ्या आक्रमणाचा कोथळा काढला आहे आणि तुम्ही ती वाघनख नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या वाघ नखांवर वाद सुरू आहे, आम्हाला वाद घालायचा नाही. निवडणुका आल्यातर अशा प्रकारच्या कल्पना डोक्यात येतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ते सगळं मराठी माणसाला तसेच जगाला प्रेरणादायी आहे.पण ही वागणूक आणून आपण काय करणार आहे? परत दिल्लीची गुलामी करणार आहेत ना? एक प्रकारे ही वाघनख आणून तुम्ही या वाघ नखांचा अपमान करत आहात, कारण आपण महाराष्ट्राला दिल्लीचा गुलाम केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ही वाघनखं यासाठी वापरली कारण त्यांना महाराष्ट्राला गुलामीतून मुक्त करायचं होतं. म्हणून त्यांनी वाघनख वापरून दिल्लीचा कोथळा काढला आणि हे गुलाम ज्यांनी महाराष्ट्राला दिल्लीची पायपुसणी केली आहे.