

१८१८ मध्ये तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धानंतर मराठेशाही संपून इंग्रजांच्या राजवटीला सुरवात झाली आणि त्या ब्रिटिशांनी त्यांचे ‘डिव्हाईड ॲण्ड रूल’ धोरण महाराष्ट्र मध्ये सुद्धा राबवणे सुरु केले. १९ व्या शतकाच्या सुरवातीपर्यंत ब्रिटीश जातींच्या आधारावरती हिंदू समाजामध्ये फूट पडण्यात यशस्वी झाले होते. या सगळ्याची पार्श्वभूमी अतिशय दयनीय होती. जातीय विषमतेने कळस गाठलेला होता. अस्पृश्यांना पशूपेक्षा हीन वागणूक दिली जात होती. स्त्रियांना बालविवाह व सतीप्रथेसारख्या अनेक अमानवीय चालीरीतींना बळी पडावं लागत होतं.
अशा वेळी मराठेशाहीचे वारसदार राजर्षी शाहू महाराज, हिंदू समाजामध्ये पडलेल्या फुटीला भरून काढण्यासाठी पुढे आले. अस्पृश्यतेमुळे हिंदू समाजाचे विघटन झाले, त्यामुळे अशा समाजघातक गोष्टी बंद व्हाव्यात यासाठी त्यांनी प्रयत्न केले. सामाजिक न्यायाचे प्रणेते आणि आरक्षणाचे जनक असलेले छत्रपती शाहू महाराज मातृह्रदयी शासक होते.
महाराजांनी स्वामी दयानंद सरस्वतीचा “सत्यार्थप्रकाश” हा ग्रंथ सरकारी अधिकाऱ्यांना अनिवार्य केला होता. क्षात्रजगद्गुरु धर्मपीठाची स्थापना केली आणि सर्व जातींसाठी वैदिक पुरोहीत वर्ग सुरू केले. राजर्षी शाहू महाराजांच्या बाजूने ते समाजपरिवर्तनाचे महत्त्वाचे काम. 1899 साली एक प्रकरण कोल्हापुरामध्ये घडले. कार्तिक महिन्यात शाहू महाराज पंचगंगा नदीवर स्नानासाठी जात असत. यावेळेस त्यांच्या परिवारातले काही सदस्य बंधू बापूसाहेब महाराज, मेहुणे मामासाहेब खानविलकर आणि स्नानाच्यावेळेस मंत्र म्हणणारे नारायण भटजी असत. एकेदिवशी महाराजांचे स्नेही राजारामशास्त्री भागवतही होते. महाराजांचे स्नान सुरू असताना भटजी म्हणत असलेले मंत्र वेदोक्त नसून पुराणोक्त असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी हे महाराजांच्या लक्षात आणून दिलं. महाराजांनी भटजींना विचारताच त्यांनी शूद्रांना पुराणोक्त मंत्रच सांगावे लागतात असं उत्तर दिलं. हे उत्तर शाहू महाराजांसाठी एका मोठ्या विचारमंथनाचं कारण ठरलं. हिंदू असूनही हा अधिकार सगळ्यांना का नाही, या ज्ञाना वर मर्यादा का? हे प्रश्न शाहू महाराजांच्या समोर उभे राहू लागले.
हिंदू समाजामध्ये पडलेली फुट समजून घेत, समाजाला एकत्र कारण्याकरता भेदभावाला आळ घालणे जरुरी होते आणि त्या साठी वेदोक्ता चे शिक्षण सर्वाना अधिकार मिळायला हवे हे महाराजांच्या लक्षात आले. त्यानंतर महाराजांनी हा अधिकार मिळावा असा आग्रह धरला आणि तसेही प्रयत्नही केले. यातून वेदोक्ताच्या संघर्षाचे पडसाद सर्व महाराष्ट्रभर उमटले. इंग्रज अधिकार्यांना या वादातून वेगळेच काही साधायचे होते
शाहू महाराजांनी विविध जातींतील मुलांना वेद शिकण्याचा अधिकार मिळावा यासाठी थेट वैदिक स्कूल काढूनच आपल्या कृतीतून उत्तर दिले. शाहू महाराजांनी 1905 मध्ये आपल्या घराण्यातील धार्मिक विधी वेदोक्त प्रकारे व्हावे असे आज्ञापत्र काढले. तसेच संकेश्वर करवीर मठांच्या शंकराचार्य करून त्याबाबतीतले आज्ञापत्र ही मिळवले.
ज्या ब्राह्मणांनी वेदोक्त पद्धतीने विधी करण्यास नकार दिला त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली. संस्थानचे राजोपाध्यांचे राजसेवेसाठी दिलेले 30 हजारांचे इनाम जप्त करण्यात आले. करवीरच्या शंकराचार्य मठाचे ब्रह्मनाळकर स्वामी यांचे 50 हजार रुपयांचे उत्पन्न सरकारजमा करण्यात आले. इतरही शेकडो लोकांचे उत्पन्न आणि इनाम सरकारजमा करण्यात आले.
समाजक्रांतीचे हे कार्य शाहू महाराजांनी केवळ आपल्या संस्थानापुरते मर्यादित न ठेवता इतर संस्थानिकांनाही उद्युक्त केले. इंदूरच्या महाराजांना या संबंधात ते म्हणतात, “आपण अस्पृश्यांना अमानुष वागणूक देतो. परिणामी ते इस्लाम किंवा ख्रिचन धर्म स्वीकारतात. धर्मांतर केलेल्या त्या लोकांना स्पर्श करायला आपल्याला अयोग्य वाटत नाही. असा भेदभाव वेदांत सांगीतलेला नाही. ह्या गोष्टीत मी पुढाकार घेतल्यामुळे लोक माझे अनुकरण करतील.”
अस्पृश्यतेबरोबरच जातिभेदाशी शाहूंनी अखेरपर्यंत संघर्ष केला. अस्पृश्यतेचा व्यवहार व समर्थन करणार्या आपल्या नातेवाईकाला शिक्षा करताना राजर्षी शाहू डगमगले नाहीत.
बहुजन समाज सुशिक्षित झाल्याशिवाय त्यांचा उध्दार होणार नाही. बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारिद्य्र, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत, हे जाणून शाहूंनी शिक्षणाच्या, विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला.आपल्या कारकीर्दीत त्यांनी सुमारे शंभर शाळा काढल्या. खेड्यापाड्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राहण्याची सोय व्हावी म्हणून शाहू महाराजांनी वसतिगृहे बांधली. त्याच प्रमाणे विविध समाजातील लोकांना अनुदान देऊन वसतिगृहे बांधण्यास प्रोत्साहनही दिले.
वेदोक्त अभ्यास सगळ्यांसाठी उपलब्ध त्यांनी फक्त समज नाही सुधारण्यास मदत नाही झाली तर, हिंदू समाज एकजूट करण्यासाठी मदत झाली. महत्वाचे म्हणजे, हिंदू समाजाच्या चौकटीमध्ये राहून, त्यांनी हि समाजसुधारणा केली. या समाज सुधारण्या मागचे एकच उद्दिष्ट होते. समाजात जातीच्या आधारावर जी फूट निर्माण झाली आहे त्याशी लढा देणे हा समाजसुधारण्यामागील हेतू होता.
खेड्यापाड्यांतील मुलांना उच्चशिक्षणाची सुविधा मिळावी, म्हणून छत्रपती
शाहू महाराजांनी कोल्हापुरात मराठा, जैन, लिंगायत, सुतार, नाभिक, महार, चांभार-ढोर इ. जाती जमातींसाठी वसतिगृहे स्थापन केली. शिवाय नाशिक, पुणे, नगर, नागपूर इ. अन्य ठिकाणी त्यांच्या प्रेरणेने व साहाय्याने अनेक वसतिगृहे सुरू झाली. त्यांच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील अनेक पिढ्या शिकून तयार झाल्या.
चातुर्वर्ण्य समाजरचना मोडून तेथे समताप्रधान समाजरचना, लोकशाही आणि समाजवाद प्रस्थापित करून भारताच्या विविधतेला एक राष्ट्रीयत्व प्राप्त करून देणे, हे राजर्षींचे अंतिम उद्दिष्ट होते आणि हे उदिष्ट प्राप्त करण्यासाठी त्यांनी सर्व पातळींवर प्रयत्न केले.
यातले खरे तात्पर्य हे की छत्रपती शाहू महाराजांनी एक खरा राज्यकर्ता असण्याची भूमिका अगदी चोख पार पाडली. हिंदू धर्मात जी घाण पसरली होती आणि हिंदुत्वाची जी मूल्ये दूषित झाली होती, त्याची दाखल घेऊन त्यांनी हिंदू समाजात तशी सुधारणा केली आणि क्षत्रियकुलावतंस हिंदुपदपातशहा छत्रपती शिवाजी महाराजांचे दत्तक असूनही ‘खरे’ वंशज असल्याचे सिद्ध केले आणि त्या गादी बरोबर जी जबाबदारी येते तिची शान आणखी वाढवली हे खरे