नांदेड -ओबीसी OBC नेते तथा राज्याचे मंत्री छगन भुजबळ Chhagan Bhujbal हे आज हिंगोलीतील ओबीसी एल्गार सभेला जात असताना सकल मराठा समाजाच्या वतीने पिंपळगाव फाटाजवळ त्यांच्या गाड्यांना काळे झेंडे दाखवत,ताफा अडवण्याचा निषेध व्यक्त करण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यात ओबीसी समाजाने निषेध केला. मंत्री छगन भुजबळ हे मराठा समाजाबद्दल गरळ ओकत आहेत त्यामुळे हे काळे झेंडे दाखवण्यात आल्याचे सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले. त्याचबरोबर छगन भुजबळ यांनी मराठा समाजाविरोधात यापुढे अपशब्द वापरु नयेत अशी विनंती यावेळी मराठा समाजाकडून करण्यात आली.













