विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल

0

अमरावती(Amravati), 13 मे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी-2024 बी.आर्च. सेमि-8 (सी.जी.एस.), बी.ए. सेमि.-1 (सी.बी.सी.एस.), एम.ए. (जर्नालिझम अॅन्ड मास कम्युनिकेशन) सेमि.-4 (सी.बी.सी.एस.) (रिवाईज्ड), बी.एस्सी. सेमि.-1 (सी.बी.सी.एस.)एम.पी.एड्. सेमि.-4 (नवीन), बी.पी.एड्. अॅन्ड एम.पी.एड्. सेमि.-1 व 2 (नवीन), पी.जी, डिप्लोमा इन नॅचरोपॅथी अॅन्ड योगिक सायन्स सेमि.-2 (एन.ई.पी.), बी.ई. सेमि.-1 व 2 आणि बी.टेक. सेमि.-1 (इंजि. सी.जी.एस.), बी.ई. सेमि.-4 (आय.टी. अॅन्ड एक्स्टेंशन) (सी.जी.एस.) आणि एम.एस्सी. (अप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स) (सी.बी.सी.एस.-नवीन) एस-4 या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून दुरुस्ती/सुधारित/नवीन वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

यासंदर्भात सर्वसंबंधित महाविद्यालयांना परीक्षा विभागाकडून कळविण्यात आले असून महाविद्यालयांनी तातडीने आपल्या विद्याथ्र्यांना कळवायचे आहे. तरी विद्याथ्र्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या प्रभारी संचालक सौ. मोनाली तोटे पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता त्यांचेशी 9763833969 या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.