

नागपूर (Nagpur): महाराष्ट्रातील युवकांनी अर्थकारणासाठी जगभर जावे आणि मानसिकतेत बदल करून अर्थकारणात प्रगती करण्यासाठी व्यवसाय, व्यापार व उद्योग या क्षेत्रात आपली उर्जा, बुध्दी व कौशल्याचा वापर करावा असे आवाहन संभाजी ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांनी केले. ते ७ आक्टोबर २०२४ सोमवारला वर्धा रोड वरील छत्रपती चौका जवळील ऊर्वेला काॅलनी येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स (बानाई) सभागृहात उपस्थितांना संबोधित करताना अध्यक्षपदा वरुन बोलत होते.
महाराष्ट्रातील युवकांना संबोधत ते म्हणाले की,गावाच्या कट्ट्यावर बसून राजकारणाच्या गप्पा मारण्यापेक्षा
आर्थिकीकरणावर, उद्योगावर, व्यवसायावर,जागतिकीकरणावर व जगात निर्माण झालेल्या विविध नाविण्यपूर्ण शोध आणि संधीवर चर्चा करून पारंपारिक सानाजिक व आरक्षणाच्या मानसिकतेत बदल करून मराठा भाषिक बहुजन युवकांनी अर्थकारणासाठी जगभर जाण्याचे आवाहन त्यांनी केले. ते “समाजकारणातून अर्थकरणाकडे” या विषयावर बोलत होते.महाराष्ट्रातील होतकरू तरुणांना जगभरात विविध उद्योगधंद्याच्या संधी निर्माण करून देण्यासाठी “अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा, अवघा मुलुख आपुला..!” या संकल्पनेद्वारे समाजकारणातून अर्थकारणाकडे महाराष्ट्रातील तरुणांना वळण्यासाठी नागपूर नगरीत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष सुधांशू मोहोड यांच्या संकल्पनेतून ‘समाजकारणातून अर्थकरणाकडे’ जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमोद काळबांडे, संपादक दैनिक सकाळ,नागपूर, बालाजी धोबे, अध्यक्ष कांचनी फार्मर प्रोड्युसर कंपनी, सोबतच नेटवर्कर वैशाली देशमुख व प्रशांत देशमुख यांचा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सत्कारमुर्ती प्रमोद काळबांडे यांनी तिसऱ्या भारतातील सामाजिक विषमतेवर विस्तृत प्रकाश टाकत भटके-विमुक्त व गांजलेल्या लोकांच्या समस्यांवर परखड टिकास्त्र सोडले व भारतातील वास्तविकतेचे वाभाडे काढत वास्तव मांडले. ते म्हणाले की, समाजातील उपेक्षित व वंचित वर्गातील लोकांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती ही लाजिरवाणी असल्यामुळे भारत हा देश विश्वगुरू कसा? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. बानाईचे विश्वस्त प्रदीप नगराळे यांनी देशातील आर्थिक विषमतेवर प्रकाश टाकला. या प्रभावशाली विचारवंतांनी सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विषमतेबाबत खंत व्यक्त करीत याबाबत जागृती केली. देशात शिक्षणात विषमता निर्माण केली जात असून नागरिकांना अंधश्रद्धेत ढकलण्याचे राजकारण सद्या देशात गतिशील आहे, असे त्यांनी उदाहरणासह स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे संचालन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विनोद मानकर यांनी केले. प्रास्ताविक व भुमिका सुधांशू मोहोड यांनी मांडली. आभार प्रदर्शन विनोद उलीपवार यांनी केले. कार्यक्रमासाठी अतूल गुडधे पाटील व बानाई संस्थेने मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डाॅ. किरण भुयार,वनमाला राऊत,प्रा. जयश्री काळे, कौशिक देशमुख, रवींद्र राऊत,राम आकरे,
कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक प्रवीण दादा गायकवाड यांनी सांगितले की आपला विचार बदला, विचार बदलला तर काळ बदलत आहेत वेळ बदलत आहेत. म्हणून स्वतःला बदलून घेऊन अर्थकारणासाठी पुढे यावं, अर्थकारण प्रबळ असल्याशिवाय कुटुंब प्रबळ असू शकत नाही. आपला समाज, आपला देश, प्रबळ असू शकत नाही. आर्थिक चळवळ सामाजिक चळवळीत प्रवर्तन झाली पाहिजे, असे आवाहन देखील यावेळी प्रवीणदादा गायकवाड यांनी केले. प्रवीण दादा गायकवाड यांनी विविध प्रश्नांना वाचा फोडत अर्थकरण करण्यासाठी मानसिकता बदलण्याची कृती बदलण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच सरकार 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देत आहेत लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका शेतकरी ही योजना राबवून मल्लमपट्टी करत आहेत. हे किती दिवस चालणार आहेत, टॅक्स कोण भरणार आहेत. मग सरकारकडे पैसे येणार कुठून सरकारने यापेक्षा नागरिकांना अर्थकारण बदलण्यासाठी ठोस व योग्य निर्णय घ्यावा जेणेकरून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत आणि फक्त बहुजन समाजातील युवकांनी अर्थकारणासाठी बाहेर पडून फक्त अर्थकारण करावे. असे आव्हान शिवश्री प्रवीण दादा गायकवाड यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद मानकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन विनोद उलीपवार यांनी केले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ संपादक व लेखक चंद्रकांत वानखेडे, ज्ञानेश्वर रक्षक, अरविंद गेडाम, संजय पन्नासे, संजय शेंडे, अनंत नास्नुरकर, राजीव जगताप, सुनील दुधे, आदी संभाजी ब्रिगेड केंद्रिय कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीरविंद्र राऊत, राम आकरे, राजीव लोहे, अविनाश चौधरी, राजू खडसे, उत्तम सुळके, निकेश पिने, अँड. निकेश ढोके, दिनेश ईरे, नितीन केदार, तन्मय देशमुख, स्वप्निल पावडे, अनिरुद्ध मोहोड, योगेश टेकाडे यांनी परिश्रम घेतले.