
नागपूर NAGPUR : राष्ट्रवादी काँग्रेस हा NCP पक्ष ओबीसीचा पहिल्या नंबरचा शत्रु आहे.विदर्भात येऊन राष्ट्रवादी दोन दिवसीय शिबीर घेतले मात्र नागपुर अधिवेशन हे केवळ दिखावा होता. ओबीसी जनता राष्ट्रवादीला कधीही समर्थन करणार नाही. राष्ट्रवादीने ओबीसीचा सतत घात केला आहे. भविष्यात भाजप-सेना युतीचेच सरकार राज्यात सत्तेत येणार असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रपरिषदेत केला.
लोकसभा निवडणुकीबाबच आपल्याला काही कल्पना नाही. २८८ विधानसभेचे निवडणुक प्रमुख भाजपने जाहीर केले आहेत. यासोबतच ४८ लोकसभेचे निवडणुक प्रमुख जाहीर केले आहेत. ज्याठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे उमेदवार असतील त्यांना भाजप पेक्षाही अधिक पाठिंबा देणार आहोत. राज्यात आम्ही भाजप- सेना मिळुन ४५ प्लस लोकसभा आणि २००प्लस विधानसभा जागाआम्ही जिंकू असे नियोजन आहे. महाविकास आघाडीला बरखास्त करुन भाजप आणि शिवसेना युती निवडणुन येईल.
दरम्यान,मुख्यमंत्री जम्मु-काश्मिर दौरा संदर्भात बावनकुळे म्हणाले,एखादा व्यक्ती दिवसरात्र १८-२० तास काम करतो आणि जर तो तीन दिवस आपल्या कुटुंबासोबत कुठे गेले तर गैर काय आहे. प्रत्येकाने आपल्या कुटुंबासाठी वेळ काढलाच पाहिजे.
मनुष्य जेव्हा आपल्या जीवनातील संपुर्ण वेळ समाजाकरिता समर्पित करतो तेव्हा समाज ही मान्य करतो की, परिवारासाठी वेळ दिला पाहिजे. खा संजय राऊत यांना योग्य उत्तर नितेश राणे देतील असे सांगत बोलणे टाळले.