

चंद्रपूर (Chandparur) :- चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस झालेले व सध्या चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात एमएस किंवा एमडीचे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी वस्तीगृहात राहणाऱ्या निवासी डॉक्टर्सपैकी पाच डॉक्टर विद्यार्थ्यांना डेंग्यूची (Dengue) लागण झाली आहे. यापैकी एका विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
मात्र ज्या वस्तीगृहामध्ये विद्यार्थी राहतात त्या वस्तीगृहाची अजूनही अधिष्ठाता कार्यालयातील किंवा जिल्हा प्रशासनातील कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्याने साधी पाहणी केलेली नाही. खाजगी रूग्णालयात उपचार घेत असलेल्या आजारी निवासी डॉक्टर्सची भेट घेण्याचे औचित्य सुध्दा कोणी दाखवले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांसोबत आता शिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टरांनाही वैद्यकीय महाविद्यालय व शासनाने वाऱ्यावर सोडले असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते पप्पू देशमुख यांनी केलाय.