

चंद्रपूर (Chandrapur), 21 जुलै – बल्लारशाह-गोंदिया रेल्वे रुळावर एका नर अस्वलीचा वन विकास महामंडळाच्या लोहारा जंगला परिसरात रेल्वेच्या धडकेत अपघाती दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली.
बल्लारशाह-गोंदिया रेल्वे रुळावर ( Ballarshah-Gondia railway line)गोंदियाकडून येणाऱ्या रेल्वेच्या धडकेत जंगला परिसरात अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला. रेल्वे विभागाकडून वनविभागाला या घटनेची माहिती देण्यात आली. रेल्वेचे कर्मचारी व वनविभागाचे कर्मचारी घटनेच्या ठिकाणी पोहोचले. विरुद्ध दिशेने येणारी मालगाडी गोंदिया कडे जात होती, ती मालगाडी सुमारे २ तास अस्वल मृत पावलेल्या ठिकाणी थांबून होती. वनविभाग व रेल्वेचे कर्मचाऱ्यांनी मिळून अस्वलीला रेल्वे रुळावरून बाजूला केले, तेव्हा ती मालगाडी पुढे निघाली.बल्लारशा-गोंदिया रेल्वे रुळावर मागील तीन दिवसात ४ अस्वलीचा रेल्वेच्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे, “डेथ ट्रॅक” म्हणून ओळख झालेल्या ह्या रेल्वे रुळावर अनेक वन्यजीवांना जीव गमवावा लागत आहे. ‘हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटी’ तर्फे जुनोना वनपरिक्षेत्राधिकारी यांना बल्लारशाह-गोंदिया रेल्वे रुळावर उपशमन योजना मार्गी लागण्यासाठी पत्र देण्यात आले आहे. अस्वलीचे शवविच्छेदन डॉ. कुंदन पोडचलवार यांनी केले. यावेळी जुनोना वनविकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Balharshah gondia railway line route map