Chandrapur News : मोकाट जनावरे सोडणे महागात पडले; थेट पोलिसात तक्रार

0

चंद्रपूर(Chandrapur) १० जुलै :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे(NMC) शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मोहीम सुरू असुन याअंतर्गत आतापर्यंत ३३ मोकाट जनावरांच्या मालकांवर पोलिसात तक्रार करून गुन्हा नोंद करण्यात आली आहे.

शहरातील मुख्य तसेच इतर मार्गांवर, रस्त्यांवर मोकाट जनावरे ठाण मांडून बसून राहात असल्याने वाहनधारकांचा अपघात होण्याची शक्यता अधिक असते. याबाबत मनपातर्फे यापुर्वीही कारवाई करून जनावरांच्या मालकांना समज देण्यात आली आहे.समज दिल्यानंतर काही काळ ते आपल्या जनावरांवर लक्ष देऊन ते रस्त्यावर येणार नाही याची काळजी घेतात,मात्र त्यानंतर पुन्हा जनावरांना मोकाट सोडुन देण्यात येते असे निदर्शनास आले होते,त्यामुळे अश्या ३३ मोकाट जनावरांच्या मालकांवर पोलिसात तक्रार करून गुन्हा नोंद करण्यात आली आहे.

जनावरांच्या मालकांनी आपल्या जनावरांचा योग्य बंदोबस्त करावा, अन्यथा यापुढेही सरळ फौजदारी कारवाई केली जाणार आहे. याकरीता मनपाच्या उपद्रव शोध पथकांची यावर नजर राहणार असुन सातत्याने वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या जनावरांच्या मालकांची नोंद घेऊन त्यावर कारवाई केली जात आहे. तसेच मोकाट जनावरे दिसल्यास नागरिकांना तक्रार करता यावी म्हणुन मनपातर्फे ०९५१८९७६६५० हा संपर्क क्रमांकसुद्धा देण्यात आला असुन यावर तक्रार केल्यास कारवाई केली जाणार आहे.

 

WIFE SWAPPING : चंद्रपुरातील प्रसिद्ध हॉटेलची चर्चा

Chandrapur job
Chandrapur marathi
Chandrapur in which district
Chandrapur is famous for
Chandrapur in which state
Chandrapur map
Chandrapur history
Chandrapur gov in