Chandrapur News : “क्रीडा पर्व” अंतर्गत बाईक रॅलीचे आयोजन

0
Chandrapur News : "क्रीडा पर्व" अंतर्गत बाईक रॅलीचे आयोजन
chandrapur-news-organized-bike-rally-under-kreeda-parv

श्रमिक पत्रकार भवन, वरोरा नाका चंद्रपूर इथून सुरुवात

चंद्रपूर (Chandrapur ) :- डेव्हलपमेंट अँड रिसर्च एज्युकेशन मल्टीपर्पस सोसायटी (ड्रीम) चंद्रपूरच्या वतीने मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून क्रीडा दिनानिमित्त दिनांक 25 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट 2024 या दिवसांमध्ये क्रीडा पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या पर्वाचे उद्घाटन दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी हॉकी स्पर्धेने झाली.

क्रीडा पर्वाचा शेवटचा दिवस म्हणजे 29 ऑगस्ट 2024 रोजी संध्याकाळी 4:30 वाजता शहरात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे ही रॅली श्रमिक पत्रकार भवन, वरोरा नाका, चंद्रपूर इथून चालू होऊन परत तिथेच परत येऊन त्याचे रूपांतर समारोपीय कार्यक्रमात होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अविनाश पुंड जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रपूर राहणार आहे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आ. किशोर भाऊ जोरगेवार चंद्रपूर क्षेत्र, इंजि. गौतम नागदेवते सामाजिक कार्यकर्ता, आशिष मासिरकर सामाजिक कार्यकर्ता, अनुताई देगावकर सामाजिक कार्यकर्ता, सचिन राखुंडे API महाराष्ट्र पोलीस, इंजि. प्रदीप अडकीने सामाजिक कार्यकर्ता यांची प्रामुख्याने मंचावर उपस्थित राहणार आहे.

या “क्रीडा पर्वा” ला यशस्वी करण्यासाठी ड्रीम चंद्रपूरचे अध्यक्ष प्रेम गावंडे, उपाध्यक्ष अभिजीत दुर्गे, सचिव अनिल ठाकरे, कोषाध्यक्ष शेंडे, रुपेश चव्हाण सचिव हॉकी प्रमोटर असोसिएशन चंद्रपूर, विक्की पेटकर, निखिल पोटदुखे, अमोल सदभैय्ये, सोनाली गावंडे, आयेशा खान, प्रियंका मंडल, श्रुती भारती, समृद्धी गेडाम, करिष्मा राजपूत, शर्वरी लभाणे, निधी झाडे, कोमल चौधरी, शुभम साखरे, शुभम पुणेकर, लोकेश मोहुर्ले, दिनेश सावसाकडे, आकाश इंगळे, सिद्धार्थ सूर्यवंशी, अपूर्व खुलसंगे, स्वप्निल घोंगडे आदीने परिश्रम केले.

Chandrapur population 2024
Chandrapur wikipedia in marathi
Chandrapur in which district
Chandrapur is famous for
Chandrapur distance
Chandrapur in which state
Chandrapur area
Chandrapur map