Chandrapur News : इतर मागास बहुजन कल्याण विभागात पदे भरण्याची मागणी

0
Chandrapur News : इतर मागास बहुजन कल्याण विभागात पदे भरण्याची मागणी
chandrapur-news-demand-for-other-backward-posts-in-bahujan-welfare-department

 

चंद्रपूर (Chandrapur) :- राज्य सरकारणे बाह्य यंत्रणेव्दारे कामे करून घेण्यासाठी दिनांक 6 सप्टेंबर 2023 ला 9 कंपन्यांना मान्यता देण्यात आली होती. त्यावेळी अनेक संघटनेच्या वतीने आंदोलने करण्यात आली होती. राज्य सरकारने ते परिपत्रक 31 ऑक्टोबर 2023 ला रद्द केले. याच परिपत्रकाचा इतर मागास बहुजन कल्याण विभागाने आधार घेऊन बी. एस. 2 इम्फोटेक इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी, प्रशासकीय सोयीसाठी दिनांक 21 ऑक्टोबर 2023 पासून 9 महिन्यासाठी प्रशासकीय अडचणी येऊ नये म्हणून 20 जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

महाराष्ट्र सरकारणे (Government of Maharashtra) कायम स्वरूपी पदे भरणे गरजेचे होते, आज राज्य शासनाकडे एकूण एक लाख त्याच्यावर ओबीसी विजा भज विमाप्र अनुसूचित जाती जमाती यांचा बॅकलॉग असून तो न भरता इतर मागास बहुजन कल्याण विभागाने एकूण 870 पदाची 26 जुलै 2024 ला बाह्य संस्थे‌द्वारे पदे भरण्या करिता ई-निविदा काढण्यात आली आहे. व त्याची मुदत 16 ऑगस्ट 2024 पर्यंत होती.

राज्य शासनाने बाह्य संस्थेद्वारे पदे भरल्यास ओबीसी, विजा., भज., विमाप्र., अनुसूचित जाती जमातीच्या व सामान्य प्रवर्गातील बेरोजगार मुला मुलींवर अन्याय होणार असून इतर मागास बहुजन विभागातील व ओबीसी वसतीगृहातील वार्डन पदे कायमस्वरूपी भरून ओबीसी, विजा, भज, विमाप्र, अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील बेरोजगार मुला-मुलींना न्याय मिळवून ‌द्यावा, तसे नाही झाल्यास आंदोलन करण्यात येईल. असे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी जिल्हाधिकारी मार्फत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता, ओबीसी मंत्री चंद्रपूर चे पालकमंत्री, इतर मागास बहुजन कल्याण प्रधान सचिव यांना पाठविण्यात आले.

निवेदन देते वेळी यावेळी सचिन राजूरकर महासचिव राष्ट्रीय ओबीसी महासंघ ,सतीश भिवगडे ,सुधाकर काकडे ,कृष्णा मसराम आदिवासी विकास परिषद जिल्हाध्यक्ष,शुभम मडावी ,कुसुमताई उदार ,सूरज कोवे,अक्षय येरगुडे,आकाश लोडे,मनिषा बोबडे जिल्हा महासचिव महिला महासंघ ,आसाराम राघोते,रविंद्र टोंगे जिल्हाध्यक्ष विध्यार्थी महासंघ ,राहुल चालूरकर ,प्रशांत पिंपळशेंडे ,अनिकेत पिंपळशेंडे यांची उपस्थिती होती. बॉक्स- रवींद्र टोंगे यांचे 21 दिवस आंदोलन चालले तेव्हा सरकारने दिनांक 29 सप्टेंबर 2023 ला मुंबई येथे झालेल्या बैठकीत ओबीसीचा बॅकलॉग भरण्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाला लेखी आस्वासन दिले होते. इतर मागास बहुजन कल्याण विभागाने वसतिगृह काही ठिकाणी सुरू केले आहेत नियुक्त्या कोणत्या केल्या प्रश्न आहेत?

Chandrapur theatre
Chandrapur wikipedia in marathi
Chandrapur in which district
Chandrapur distance
Chandrapur is famous for
Chandrapur area
Chandrapur in which state
Chandrapur gov in