

चंद्रपूर, (Chandrapur) 4 जुलै: आज सकाळी, चंद्रपूरमधील रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये धक्कादायक घटना घडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) जिल्हाध्यक्ष अमन आंदेवार यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून गंभीर जखमी केले.
अनदेवार यांचे जनसंपर्क कार्यालय रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये आहे. आज सकाळी ते कार्यालयात असताना काही अज्ञात व्यक्ती दबा धरून बसले होते. हल्लेखोरांनी अनदेवार यांच्यावर अचानक हल्ला करून त्यांना गोड्या मारून जखमी केले. यानंतर हल्लेखोरांनी अनदेवार यांना गोळीही मारली आणि घटनास्थळावरून पळ काढला.
अनदेवार यांना पाठीवर एक गोळी लागली असल्याची माहिती आहे. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असून ते उपचारांधीन आहेत. यापूर्वी, रघुवंशी कॉम्प्लेक्समध्येच काही महिन्यांपूर्वी फिल्मी स्टाईलमध्ये गोडीबरोबर हल्ला झाला होता. त्यावेळी अमन आंदेवार यांच्या भावावर, आकाश आंदेवार यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.
अमन अनदेवार आणि आकाश आंदेवार हे सुरज भोरिया हत्याकांडाचे आरोपी आहेत. या हल्ल्यामागे याच हत्याकांडाचा बदला घेण्याचा प्रयत्न तर नाही असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे. या घटनेमुळे चंद्रपूरमध्ये तणाव निर्माण झाला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी हल्लेखोरांना त्वरित अटक करण्याची मागणी करत आंदोलन सुरू केले आहे.
ठळक मुद्दे: ८ ऑगस्ट २०२० रोजी दारू व्यवसायातील वर्चस्वातून बल्लारपूर येथे सूरज बहुरिया याची दोनजणांनी गोळ्या झाडून भर चौकात हत्या केली होती. . या हत्याकांडामध्ये अमन आंदेवर व आकाश आंदेवार या सख्ख्या भावांना बल्लारपूर पोलिसांनी अटक केली होती. आकाशची कारागृहातून सुटका झाली. तेव्हापासून सूरज बहुरियाचे समर्थक आकाशच्या मागावर असल्याचे समजते. यातूनच आकाशवर हनी ट्रॅप रचून चंद्रपुरात त्याला संपविण्याचा कट रचला असावा.