चंद्रपूर: गडचांदूरमध्ये सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त

0

गडचांदूर: चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर शहरात आरोग्य विभाग आणि अन्न व औषधी प्रशासनाने संयुक्त कारवाई करून 216.1 किलोग्राम सुगंधित तंबाखू जप्त केला आहे.(Chandrapur: Large quantity of fragrant tobacco seized in Gadchandur.)

शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या जिलानी किराणा व एजन्सी या दुकानातून सुगंधित तंबाखूची बेकायदेशीर विक्री होत असल्याची माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्यांनी दुकान, घर आणि गोदाम या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत आरोपी हाजी अन्वर रजक अलेख यांच्या घराखालील गोदाममध्ये सुगंधित तंबाखूचा मोठा साठा सापडला.

या प्रकरणी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा सल्लागार डॉ. श्वेता सावलीकर यांनी जनतेला तंबाखू सारख्या जीवघेण्या व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.