चंद्रपूर : इरई धरणाचे २ दरवाजे उघडले

0

चंद्रपूर 21 सप्टेंबर (हिं.स.)- इरई धरणातील पाण्याची पातळी स्थिर ठेवण्यासाठी धरणाचे २ दरवाजे बुधवारी सायंकाळी उघडण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात गुरुवारी सकाळी २ तासात धो-धो पाऊस बरसला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पण तत्पूर्वी इरई धरणातील पाण्याची पातळी स्थिर ठेवण्यासाठी धरणाचे २ दरवाजे बुधवारी सायंकाळी ०.५ मीटरने उघडण्यात आले आहेत.