चंद्रपूर लोकसभा मतदारसंघांसाठी आता १५ उमेदवार रिंगणात

0

चंद्रपूर (Chandrapur ), 30 मार्च, : शनिवारी शेवटच्या दिवशी कोणत्याच उमेदवारांनी अर्ज मागे घेतला नाही, त्यामुळे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघांसाठी आता १५ उमेदवार रिंगणात आहेत.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात अर्जाच्या छाननीनंतर १५ उमेदवार वैध ठरले होते. शनिवारी शेवटच्या दिवशी कोणत्याच उमेदवारांनी अर्ज मागे घेतला नाही, त्यामुळे आता १५ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये प्रतिभा सुरेश धानोरकर (काँग्रेस), सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार (भाजप), राजेंद्र हरिश्चंद्र रामटेके (बसपा), राजेश वारलुजी बेले (वंचित बहुजन आघाडी) अवचित श्यामराव सयाम (जनसेवा गोंडवाना पार्टी), अशोक राणाजी राठोड (जय विदर्भ पार्टी), नामदेव माणिकराव शेडमाके (गोंडवाना गणतंत्र पार्टी), पूर्णिमा दिलीप घोनमोडे (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), वनिता जितेंद्र राऊत (अखिल भारतीय मानवता पक्ष), विकास उत्तमराव लसंते (सन्मान राजकीय पक्ष), विद्यासागर कालिदास कासर्लावार (भीमसेन),सेवाकदास कवडूजी बरके (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया- डेमोक्रेटीक) यासह दिवाकर हरिजी उराडे, मिलिंद प्रल्हाद दहिवले व संजय निलकंठ गावंडे या ३ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.