उत्तर भारतात मुसळधार पावसाची शक्यता

0

 

09MNAT6 उत्तर भारतात मुसळधार पावसाची शक्यता

नवी दिल्ली, 09 सप्टेंबर (हिं.स.) : देशात मान्सूनचे पुनरागमन झाले असून आगामी 24 तासात उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

उत्तराखंड-उत्तर प्रदेशपासून केरळ-तामिळनाडूपर्यंत चांगला पाऊस पडत आहे.मान्सूनचे प्रस्थान होण्यास 21 दिवस शिल्लक आहेत. देशातील सरासरी पाऊस अजूनही 11 टक्के कमी आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 1 जून ते 8 सप्टेंबर दरम्यान देशात 754.5 मिमी पाऊस पडला, तर यावेळी केवळ 675.2 मिमी पाऊस झाला आहे. हिमाचलमध्ये सामान्यपेक्षा 24 टक्के जास्त आणि केरळमध्ये सरासरीपेक्षा 43 टक्के कमी पाऊस झाला.

हिमाचल प्रदेशात 10 दिवसांपासून मान्सून कमकुवत आहे. येत्या 5 ते 6 दिवसांत पावसाची शक्यता कमी आहे. हवामान खात्यानुसार हिमाचल प्रदेशात मान्सूनचा वेग कमी झाला आहे. परंतु, तो लवकर निघून जाण्याची शक्यता नाही. देशात सर्वप्रथम राजस्थानमधून मान्सून माघारीला सुरुवात होते. आठवडाभरानंतर हिमाचलमधूनही मान्सून निघतो. यासोबतच हरियाणामध्येही जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आगामी 13 सप्टेंबरपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय.