काँग्रेस फुटण्याची शक्यता-अंजली दमानिया

0

मुंबई-राज्यात आगामी महिनाभरात पुन्हा एकदा मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. या महिन्यात पुन्हा एकदा ऑपरेशन लोट्स घडण्याची शक्यता आहे. त्यात काँग्रेस पक्षही फुटण्याची शक्यता दमानिया यांनी व्यक्त केली. (Social Worker Anjali Damania)
दमानिया म्हणाल्या की, हे आगामी निवडणुकांच्या अगोदर होईल. भाजप काँग्रेसही फोडेल. या घडामोडी राम मंदिराच्या सोहळ्यापूर्वी किंवा नंतर घडतील. राज्यात अनेक भ्रष्ट नेते आहेत, जे राजकारणापासून दूर जायला हवे. मात्र, अशा लोकांना भाजप जवळ करते आहे. अशा लोकांना मोठे करण्याचे प्रयत्न भाजपकडून होत आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. हाच भाजप भ्रष्टाचाराविरुद्ध लढायचा का, असा विचार आमच्या सारख्या लोकांच्या मनात येतो, असेही त्या म्हणाल्या.