

(Nagpur)नागपूर: राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांना पराभूत करण्याचे जाहीर आव्हान देणाऱ्या अजित पवारांनी मंगळवारी सकाळीच शिरूर गाठत स्थानिक कामांचा आढावा घेतला.
(Deputy Chief Minister Ajit Pawar)उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल खासदार अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधत आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव करून दाखवणारच अशी भीमगर्जना केली होती. त्यानंतर मंगळवारी सकाळीच अजित पवार थेट (Amol Kolhe)अमोल कोल्हे यांचा मतदान संघ असलेल्या शिरूरमध्ये पोहोचले. यावेळी मतदारसंघातील विविध कामांचा आढावा त्यांनी घेतला. तसेच ”मी जे काही काल सांगितले ते फायनल आहे” असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांना खुले आव्हान दिले
दरम्यान, खासदार अमोल कोल्हे यांनीही अजित पवारांवर पलटवार केला. कोल्हे म्हणाले “दादांचा दरारा सर्वांना माहित आहे. त्यांनी तो दरारा केंद्रात दाखवावा आणि ठामपणे सांगावे की आमचा शेतकरी संकटात आहे, कांद्यावरील निर्यातबंदी तातडीने उठवा.” दरम्यान, खासदार अमोल कोल्हे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.