बापरे…बाळाच्या पोटातही गर्भ !

0

बुलढाणा (BULDHANA) : देवाची करणी आणि नारळात पाणी असं म्हणतात ना त्यात तसला काही प्रकार बुलढाणा जिल्ह्यात दिसून आला आहे. आईच्या पोटात बाळ आणि त्या बाळाच्या पोटातही बाळ असेल असे शक्य नाही पन असे घडले आहेत.

बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात तीन दिवसांपूर्वी एका गर्भवती महिला सोनोग्राफी साठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही 32 वर्षीय महिला असून तिला याआधी दोन अपत्य आहेत. निसर्गाने मानवाची अशा प्रकारे रचना केली आहे की विशिष्ट वयानंतर आणि शरीर रचनेत बदल झाल्यानंतर फक्त महिलाच प्रजनन करु शकतात. मात्र, आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटात बाळ हा प्रकार पाहून डॉक्टरही अचंबित झाले. 9 महिन्याच्या बाळाच्या पोटात आणखी एक बाळ वाढत आहे.

मेडिकल भाषेत अशा गर्भधारणेला ‘फीटस इन फीटू’ असे म्हणतात. अर्भकांमध्ये अर्भक असणे ही अशी घटना आहे. यात एका अर्भकाच्या पोटामध्ये दुसरे अर्भक वाढत असते. साधारणता 5 लाख गर्भवती महिलांमध्ये अशी केस एखादी आढळते. मात्र त्या बाळाचा जन्म झाल्यानंतर अडचणी निर्माण होऊ शकतात अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भागवत भुसारी यांनी दिली आहे.