चैन स्नॅचर गुन्हे शाखेच्या ताब्यात

0

 

(Akola)अकोला – मागील 10 वर्षात मध्यप्रदेश मध्ये अनेक जबरी चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या अंतरराज्यीय चैन स्नॅचरसह सराईत दरोडेखोर यांना अकोला स्थानिक गुन्हे शाखेने इंदौर येथून अटक केली असून हे अनेक ठिकाणी यांच्यावर गुन्हे दाखल होते. अकोला, अमरावती, मलकापुर, मुक्ताईनगर, भुसावळ येथे याच महिन्यात वाहन चोरी, जबरी चोरीचे गुन्हेही यांच्यावर दाखल होते. अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावत या चारही आरोपींना अटक केली.