
वर्धा : मजुर संस्थेसाठी लावण्यात आलेली निविदा किमंत १२ ते १५ कोटीची कामे रद्ध करावी महाराष्ट्र शासनाने काढलेल्या जी आर अनुसार कामाचे वाटप करावे (१)४०टक्के बेरोजगार अभियंता.(२) ३३ टक्के मोठे व लहान कत्राटंदार (ओपन)(३) ३३टक्के मजुर सहकारी संस्था असे काम वाटप करावे या मागणीसाठी सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटने च्या वतीने जिल्हा परिषद समोर धरणे साखळी उपोषण पुकारण्यात आले.वर्धा जिल्हा परिषद बाधंकाम विभाग येथे सघंटनेनचे जिल्ह्यातील कंत्राटदार यानी काम वाटपात होत असलेल्या अन्यायाविरुद्ध निषेध केला. यावेळी सुशिक्षित बेरोजगार अभियंता संधटनेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.