जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थांचे साखळी उपोषण

0

 

बुलढाणा – येळगाव येथील सरपंच व सदस्यांनी वारंवार सर्व विभागांना पत्र व्यवहार करून सुद्धा वरिष्ठ भूवैज्ञानिक सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांनी ग्रामपंचायत सुंदरखेड यांना येळगावच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीजवळ नगरपालिकेने सुंदरखेड ग्रामपंचायतला वापरण्यासाठी दिलेले पाणी साठवण्याचे टाके खोलीकरण करण्यासाठी परवानगी दिली आहे. परवानगी देताना ग्रामपंचायत येळगाव यांना कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता परस्पर परवानगी दिली आहे. टाके खोलीकरण करण्याचे सांगितले पण सदर पाण्याचे टाके हे धरणाच्या भिंतीला लागून असून टाके खोदकाम केल्यामुळे धरणाच्या भिंतीला तडे जाऊ शकतात. त्यामुळे धरणाखाली असणाऱ्या सर्व गावांना धोका निर्माण होऊ शकतो. येळगाव ग्रामपंचायतच्या सार्वजनिक विहिरीचे पाणी कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दोन गावांमधील तंटा लावण्याचे काम प्रशासनाने केले आहे. भविष्यात अनुचित प्रकार घडल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील आणि टाके खोली करण्याचे काम तात्काळ थांबवण्यात यावी अशी मागणी यावेळी सरपंच दादाराव लवकर यांनी केली आहे.