

मुंबई Mumbai -राष्ट्रवादी काँगेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना ठार मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. धमकी देणाऱ्या तरुणाचं नाव प्रशांत पाटील असे असून तो मूळचा कोल्हापूरचा आहे. (Threat to Minister Chhagan Bhujbal) त्याने भुजबळ यांच्या कार्यालयात संपर्क साधून “आपल्याला भुजबळ यांना जिवे मारण्याची सुपारी मिळाल्याची आणि मी सांगून काम करतो..” असा दावा त्याने केला होता. या घटनेनंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलिसांनी महाड येथून त्याला ताब्यात घेतले. दारुच्या नशेत त्याने ही धमकी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. Pune Police has arrested a young man who threatened to kill senior Nationalist Congress leader Chhagan Bhujbal. The name of the threatening youth is Prashant Patil and he is originally from Kolhapur. (Threat to Minister Chhagan Bhujbal). A complaint was lodged with the police after this incident. Police detained him from Mahad. Police said he made the threat while under the influence of alcohol.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मंत्री छगन भुजबळ पुण्याला एका कार्यक्रमासाठी गेले होते. संध्याकाळी कार्यक्रम सुरू असताना त्यांना धमकीचा फोन आला. फोन छगन भुजबळांच्या मोबाईलवरच करण्यात आला होता. तो एका कार्यकर्त्याच्या फोनवर डायवर्ट करण्यात आलेला होता. त्यामुळे कार्यकर्त्या संतोष गायकवाड यांनी तो उचलला होता. धमकीचा दुरध्वनी करणारा तरुण महाड परिसरात असल्याची माहिती तांत्रिक तपासात मिळाली. त्यानंतर खंडणी विरोधी पथक महाडला रवाना झाले. पोलिसांच्या पथकाने पाटील याला महाड परिसरातून ताब्यात घेतले. त्याने पाटीलने दारुच्या नशेत जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे.