

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) 7 जून :- नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती नगर यांचेकडील ॲम्बेसिडर कार एमएच १२ एएच ७६४८ हे वाहन निकामी करण्यात आले आहे. या वाहनाचा ‘जेथे आहे तेथे व जसे आहे तसे’, या तत्त्वावर विक्री करावयाची आहे. त्यासाठी वाहन खरेदी करु इच्छिणाऱ्या व्यक्ती/ संस्थांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत.
इच्छुकांनी आपल्या निविदा बंद लिफाफ्यात १३ जून रोजी सायं.४ वा. पर्यंत नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती नगर येथे द्याव्यात. या निविदा शुक्रवार १४ जून रोजी सकाळी ११ वाजता तेथेच उघडण्यात येतील. अटी शर्ती व अधिक माहिती नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती नगर कार्यालयात उपलब्ध आहेत असे नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती नगर यांनी कळविले आहे.