

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागामार्फत नागपूर आणि अजनी रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास प्रकल्प वेगाने पूर्णत्वाकडे जात असून, हा प्रकल्प प्रवासी सुविधा आणि रेल्वे पायाभूत सुविधांच्या आधुनिकतेकडे टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
नागपूर स्थानकाचा पुनर्विकास 2 डिसेंबर 2022 रोजी सुरु झाला असून 1 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. मुख्य नागरी कामांमध्ये ईस्ट विंग 1, 2 आणि 3 चे टेरेस स्लॅब कास्टिंग पूर्ण झाले आहे. ईस्ट विंग 1 आणि 2 चे फिनिशिंग काम सुरु आहे आणि ईस्ट विंग 3 चे स्लॅब कास्टिंग काम सुरू आहे. दक्षिणेकडील पादचारी पुलाचे (FOB) सुधारणा कार्य यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. ईस्ट साईड बेसमेंटचे फिनिशिंग काम सुरु आहे, वेस्ट विंग 3 (फेज 2) चे स्लॅब कास्टिंग 90% पूर्ण झाले असून, वेस्ट विंग 4 चे टेरेस स्लॅब पूर्ण झाले आहे. पादचारी पूल, कंकर्स आणि ओव्हरहेड उपकरणांच्या (OHE) सुधारणा कार्यासाठी 5 टन क्रेनद्वारे पायाभूत कामे प्रगतीपथावर आहेत.
त्याचप्रमाणे, अजनी स्थानकाचा पुनर्विकास प्रकल्प 20 जानेवारी 2023 रोजी सुरु झाला असून तो 4 मे 2026 पर्यंत पूर्ण होण्याचे उद्दिष्ट आहे. ईस्ट साईड स्थानक इमारत आणि टाइप IV क्वार्टर्समध्ये अंतर्गत व बाह्य फिनिशिंग कामे सुरु आहेत. वेस्ट साईड इमारतीचे पायाभूत काम सुरू झाले आहे तसेच प्लॅटफॉर्म वरील छप्पर (COP) आणि पादचारी पुलाचे (FOB) कॉलम एन्केसिंगचे काम सुरू आहे.
या प्रकल्पांमुळे प्रवाशांच्या सोयी-सुविधा, स्थानकांची आकर्षकता आणि प्रादेशिक संपर्कक्षमता यामध्ये लक्षणीय वाढ होईल. मध्य रेल्वे हे परिवर्तनात्मक प्रकल्प गुणवत्तेसह आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे.