
वर्धा : वीर अशोक सम्राट संघटनेच्या वतीने शहरातील रस्त्यांचे सिमेंटिकरण करण्यात यावे या मागणीचे निवेदन
नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी अभिजीत पोटघरे यांना 31 ऑक्टोबर रोजी देण्यात आले.
या निवेदनामध्ये वर्धा शहरातील पावडे नर्सिंग होम ते शास्त्री चौक तसेच ठाकरे मार्केट ते धंतोली चौक या रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून रस्ता अपघातास कारणीभूत ठरत आहे.या रस्त्यावरील खड्डे चुकविण्याचे नादात अनेक वाहनचालकांचे अपघात झालेले आहेत.
ठाकरे मार्केट ते धंतोली चौक या रस्त्याचे डांबरीकरण तीन वर्षांपूर्वी करण्यात आले होते, याच रस्त्यावर जागो जागी खड्डे पडल्याने रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. ठिकठिकाणी खोल खड्डे पडल्यामुळे नागरिक, विद्यार्थी व वाहनचालक यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी या दोन्ही रस्त्यांचे सिमेंटिकरण काम तात्काळ सुरू करावे.अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी संस्थापक अध्यक्ष विक्की सवाई, जिल्हाध्यक्ष अक्षय मानकर, शहर अध्यक्षा कोमल झामरे, आणि शहर उपाध्यक्ष अकरम शेख यांची उपस्थिती होती.



















