

नागपूर (Nagpur), 11 सप्टेंबर
नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर (Famous Chef Vishnu Manohar of Nagpur)यांना इंग्लंडमधील नॉर्थ वेस्ट मराठी असोसिएशन (नॉर्वेमा) ने ‘नॉर्वेमा गणेशोस्तव 2024’ साठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे. नॉर्वेमातर्फे आयोजित मोदक बनवण्याच्या स्पर्धेत ते परीक्षक राहतील. याशिवाय, 15 सप्टेंबर रोजी नॉर्वेमातर्फे ग्रिमसा व्हिलेज हॉल, प्रेस्टन रोज येथे ‘महा-शेफ सोबत महागप्पा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून यात विष्णू मनोहर इंग्लंडमधील मराठीजणांशी संवाद साधतील.
अयोध्येतील 7000 किलोचा ‘राम हलवा’, सर्वात मोठा व्हेज कबाब, सर्वात मोठा पराठा, सर्वात मोठी पुरणपोळी, 52 तासांची नॉन-स्टॉप कुकिंग मॅरेथॉन असे एकुण 18 जागतिक विक्रम आपल्या नावावर करणारे विक्रमवीर शेफ विष्णू मनोहर यांचा G-20 शिखर परिषद-2023 मध्ये अधिकृत कॅटरर म्हणून सहभाग राहिला आहे.
टेडएक्स स्पीकर असलेल्या विष्णू मनोहर यांची 56 पाककृती पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.