महानत्यागी बाबा जुमदेवजी यांची जयंती साजरी

0

 

महानत्यागी बाबा जुमदेवजी यांची शिवनगरी खात रोड भंडारा येथे जयंती साजरी

 

 जयंती निमित्त महाप्रसादाचे आयोजन

भंडारा (Bhandara)- जुमदेवजी ठुब्रिकर उर्फ महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचा जन्म ३ एप्रिल १९२१ रोजी नागपूर मधील एका नम्र आणि गरीब कुटुंबात झाला.त्यांचे वडील विठोबाजी ठुबरीकर विणकर होते आणि आई सरस्वतीबाई एक घरगृहिणी होती.बाबा जुमदेवजींना बाळकृष्ण,नारायण आणि जगोबा असे तीन मोठे आणि मारोती नावाचा एक धाकटा भाऊ होता.वडील विणकर असल्याने आणि त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्यामुळे बाबा जुमदेवजी इयत्ता चौथीच्या पुढील शिक्षण घेऊ शकले नाही. इ.स. १९३८ मध्ये वयाच्या सतराव्या वर्षी बाबा जुमदेवजी चं लग् वाराणसीबाईशी झाले.काही कारणांमुळे त्यांनी आपला वडिलोपार्जित विणकामाचा व्यवसाय सोडला आणि त्यांनी सेठ केसरीमल यांच्याकडे काही वर्षे सुवर्णकार म्हणून काम केले.

कालांतराने त्यांनी नागपूर महानगरपालिकेत कंत्राटदार म्हणून काम करण्यास सुरुवात केली.कालांतराने बाबा जुमदेवजी ने परमात्मा एक सेवक मानव धर्म मंडळाची स्थापना केली.

त्यांनी व्यसनमुक्ती,सामाजिक ऐक्य तथा मानवी जीवनातील अंधश्रद्धा यावर मोठ्या प्रमाणावर कार्य केले.त्यांचे हे काम महाराष्ट्राबाहेर अनेक राज्यात पोहोचले.

अश्या या महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या जयंतीच्या निमित्ताने भंडारा शहरातील शिवनेरी खात रोड येथे साजरी व महाप्रसाद वितरणकरण्यात आलेअसून यावेळी अनेक सेवक उपस्थित होते.