
बर्थडे बॉयला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
(Yawatmal)यवतमाळ– पोलीस रेकार्डवरील आरोपीकडून वणी पोलिसांनी विदेशी बनावटीची रिव्हाल्वर जप्त केल्याची घटना राजूर भांदेवाडा मार्गावर घडली. शेतात वाढदिवसाची पार्टी करत असताना पोलिसांनी रेड करून या आरोपीला ताब्यात घेतले. उमेश किशोरचंद राय (वय 34) रा. महादेव नगरी चिखलगाव असे आरोपीचे नाव आहे. हवेत गोळीबार करून एका नामांकित गुन्हेगाराने आपला वाढदिवस साजरा केल्याची कबूली दिली.
याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून बर्थडे बॉयला वणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. उमेश राय हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खून, अपहरण यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. एका वर्षापूर्वी खुनाच्या गुन्ह्यातून कारागृहातून बाहेर पडला होता. उमेशकडे विदेशी बंदूक असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस त्याच्या मागावरच होते. अखेर तो पोलिसांच्या तावडीत सापडला. पुढील तपास वणी पोलीस स्टेशन करीत आहेत.