नाताळ सण उत्साहात साजरा

0

 

नाताळ सण उत्साहात साजरा

(Nagpur)नागपूर – ख्रिसमस, नाताळ सण येशू ख्रिस्ताचा जन्म दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. नागपुरात सुध्दा प्रभू येशू ख्रिस्तचा जन्म दिवस मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. नागपुरातील कामठी रोडवरिल संत फ्रँकिस डे स्लैस कथेड्रल चर्च मध्ये येशू ख्रिस्त यांचा जन्म सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रभू येशू ख्रिस्त यांची बालरुपी मूर्ती आर्च बिशप एलिस गोंसाल्विस यांनी आणून ठेवल्यानंतर जन्म झाल्यानंतर ख्रिस्त बांधवांनी नाताळ सणानिमित्य एकमेकांना शुभेच्छा दिल्या. नाताळनिमित्त नागपुरातील अनेक चर्चमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आलेली आहे. अनेकांनी सांताक्लोजची वेशभूषा केली होती.