राज्यात कॅसीनोला परवानगी नाहीच

0

मुंबई- राज्य सरकारने कॅसिनो कायदा रद्दा केला आहे. त्यामुळे आता राज्यात महाराष्ट्रात कॅसिनो सुरु करण्यावर बंदीच राहणार आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन काळात स्पष्ट भूमिका घेतली होती, अशी माहिती सुत्रांनी दिली. (No Casinos in Maharashtra) गोव्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांवर कॅसिनो सुरु करण्याची मागणी केली जात होती. पावसाळी अधिवेशनातही याबाबत चर्चा झाली होती. मात्र, महाराष्ट्रात कॅसिनोची घाण नकोच, अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती. त्यानुसार, आता कॅसिनो कायदाच रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात महाराष्ट्र कॅसिनो (नियंत्रण व कर) अधिनियम हा कायदा 1976 पासून अस्तित्त्वात आहे. त्यामुळे कॅसिनो सुरू करण्यास इच्छूक लोक वारंवार न्यायालयात जात होते. त्यामुळे महाराष्ट्रात हा कायदाच रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.