स्वातंत्र्यवीरांच्या स्मृतिस्थळी उमेदवारीचा सांगावा

0

 

स्वातंत्र्यवीर सावरकरांना ज्या कोठडीत ठेवण्यात आले होते त्याचे दर्शन घेण्यासाठी मी अंदमान-निकोबारला गेलो होतो. 13 मार्चचा दिवस होता. स्वातंत्र्यवीरांना ज्या कोठडीत ठेवले होते, तेथे होतो. तेव्हाच माझा सहकारी धावत आला आणि म्हणाला, भाऊ, तुमचे तिकीट घोषित झाले आहे.’ योगायोग कसा असतो याचा अनुभव आपल्याला आल्याचे राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. एकीकडे आपण स्वातंत्र्यवीरांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेत होतो तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदेश आला होता, असा भावनिक प्रसंग मुनगंटीवार यांनी सांगितला.

देशात आता लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी सुधीर मुनगंटीवार यांना देण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यांनतर मुनगंटीवार यांचे चंद्रपुरात आगमन झाले. त्यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. गांधी चौकात सभाही पार पडली. सभेत सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरकरांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, ‘13 मार्चला भाजपने मला अंदमान-निकोबारला लोकसभा प्रभारी म्हणून दोन दिवसांच्या जबाबदारीवर पाठविले होते. 11 तारखेला नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी ‘लोकसभा लढनी होगी’ असा आदेश दिला होता’, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.